Titar Palan : देशामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मध्ये कुक्कुटपालन अधिकाधिक प्रचलित आहे. मात्र, असाही एक पक्षी आहे, ज्यामधून शेतकरी जास्तीत जास्त नफा कमवू शकतो. आज या पक्षांचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे. तज्ज्ञांच्या मते जंगली पक्षी तीतर हा आहे. बरेशेच लोक त्या पक्ष्यांची मांस मोठ्या आवडीने खात असतात. तसेच या पक्षाला अनेक ठिकाणी लहान पक्षी म्हणूनही ओळखले जाते. तीतर आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे दिसून येत आहे. जर तीतर पक्षी पाळायचे असेल तर त्यासाठी आपल्याला सरकारकडून परवाना घेणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, वर्षभरात 300 अंडी घालण्याची क्षमता मदी तीतर पक्ष्यांमध्ये असते. तसेच तीतर पक्षाच्या जन्मानंतर 45 ते 50 दिवसांत हे पक्षी अंडी घालू लागतात. या पक्ष्यांचा व्यवसाय फार कमी कालावधीत आपल्याला सुरू करता येतो. याच बरोबर त्यांची घटणारी संख्या वाढणार असून तीतर पालकालाही यांचा बराच भरघोस नफा मिळणार आहे.
तितर पक्षी हे आकाराने लहान असतात. या पक्ष्यांना तसेच अन्न आणि जागेसाठी जास्त आवश्यक भासत नाही. त्याच बरोबरीने कमी गुंतवणूक आवश्यक आहे. आपण कमीत कमी 4-5 तीतर ठेवून सुद्धा त्याचा व्यवसाय सुरू करता येतो.
तितर पक्ष्यांची अंडी ही रंगीबेरंगी असतात. त्या मध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी आणि खनिजे भरपूर प्रमाणात असते. प्रति ग्राम अंड्यातील पिवळ बलक 15 ते 23 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल आढळत असते. तितर पक्ष्यांच्या अंड्याचे सेवन अनेक रोगांमध्ये करण्याचा सल्ला दिलेला आहे असे दिसून येते.
तितर पक्ष्याचे मांस बाजारात सहज विकले जाते. तुम्ही तितर पक्ष्याचे मास जवळ पासच्या कोणत्याही बाजारात सहज विकू शकता. एक लहान तितर पक्षी हा 50 ते 60 रुपयांना सहज विकत घेतली जाते. बटेर किंवा तितराचे पालन चांगल्या पद्धतीने आपण केल्यास प्रत्येक वर्षी आपण लाखोंचा नफा मिळवू शकतो.
- लाडकी बहिण रक्षाबंधन हफ्ता येथे चेक करा check your Ladaki Bahin installment
- मुलीच्या नावावर ₹8,000 SIP – कधी होईल ₹49 लाख? SIP For Girl Child
- लाडकी बहिण लिस्ट 3000 रु पात्र महिलांच्या यादीत नाव पहा Ladaki Bahin eligible List
- 2025 च्या नवीन घरकुल याद्या या ठिकाणी पहा New Gharkul List Download in Mobile
- भांडी संच वाटप अर्ज सुरु : बांधकाम कामगार नोंदणी : Bandhkam Kamgar Yojana