सर्व कामगारांना 2 लाखाचे कर्ज मिळणार : PM Vishwakarma Loan Apply 2024

PM Vishwakarma Loan Apply 2024 : विश्वकर्मा योजनेतूनपारंपारिक कारागीर, वास्तूशिल्पकारगीरांना मोठी मदत मिळणार आहे. व्यवसाय करण्यासाठी दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होते.

विश्वकर्मा योजनेतून खालील कारागिरांना 15 हजार रुपयांचे टूल किट व 2 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते.

सुतार, बोटनिर्माता, शस्त्र बनवणारे, लोहार, कुलूप बनवणारे, सुवर्णकार, कुंभार,शिल्पकार, मूर्तिकार, दगड फोडणारे, चर्मकार, गवंडी, पल्ली, चटई झाडू विणकर, बाहुल्या आणि पारंपारिक खेळणी बनवणारे, नाभिक, पुष्पहार बनवणारे, परीट, शिंपी, मासेमारीचे जाळे बनवणारे या सर्व व्यावसायिकांना विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे.

याव्यतिरिक्त तुम्ही स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू करायचा असेल तर उद्योग आधार किंवा शॉप ॲक्ट काढून देखील या योजनेमधून अर्ज करू शकता.

दोन टप्प्यांमध्ये या कर्जाचे वितरण केले जाणार आहे

यामध्ये 5 टक्के व्याज आकारले जाईल.

8 टक्के व्याज सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भरणार आहे, कर्ज हमी शुल्क केंद्र सरकार उचलणार असल्यामुळे अर्जदारांना यांचा कोणताही ताण पडणार नाही.

योजनेसाठी १३००० हजार कोटी

विश्वकर्मा योजना लागू करताना व योजनेची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.
विश्वकर्मा योजनांचे उद्दिष्ट पारंपरिक कारागिराद्वारे तयार केलेली उत्पादने आणि सेवांचे सहज उपलब्धता आणि गुणवत्ता वाढवणे हे आहे.

या योजनेमुळे स्थानिक कारागिरांना खूप मोठा हातभार लागणार असून या योजनेला अर्ज करायचा असल्यास खाली लिंक दिलेली आहे.

त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहात ऑनलाइन अर्ज चालू झाले आहेत.

विश्वकर्मा योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Leave a Comment