जून महिन्यात पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना खते औषधे आणि बियाण्यांसाठी पैशांची गरज भासते.हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकार लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपयांची आर्थिक मदत जमा करू शकते.
ज्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या नोंदी अद्याप या योजनेंतर्गत पडताळण्यात (Land Seeding) आलेल्या नाहीत. त्या शेतकऱ्यांना १७ व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची कमी शक्यता आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज करताना चुकीची माहिती टाकली होती. त्या शेतकऱ्यांना देखील २००० रुपये मिळणार नाहीयेत.
आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १६ हप्त्यांचे पैसे वर्ग केले आहेत. भारत सरकार लवकरच PM किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी करणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला का
मात्र, हे पैसे जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी, असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळणार.
पी एम किसान योजनेच्या धर्तीवर ती राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा तक्रार हप्ता वितरित केला जाईल त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.
तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला का