पिक विमा कुणाला किती मिळाला – आपला पिक विमा चेक करा : pik vima list PDf

By Krushi Market

Published on:

pik vima list PDf : पिक विमा कंपन्याकडून  शेती पिक विमा देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.  पिक विमा साठी क्लेम केलेले शेतकरी तसेच  अग्रीम पिक विमा साठी पात्र ठरलेली सर्व महसूल मंडळात पिक विमाचे वाटप सुरू झालेले आहे.

यंदाच्या खरीप हंगाम 2023 मध्ये फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा योजना सुरू झाल्याने तब्बल एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरलेला आहे.

त्या महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड आहे अशा ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आगरीन पिक विमा वाटपाच्या अधिसूचना काढण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा झालेला आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा जमा झाला येथे पहा 

पिक विमा साठी 1700  कोटी 73 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.  शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा भरला होता आता त्या भरलेल्या पैशाचे चीज होताना दिसत आहे.

पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली  आहे. आपल्या खात्यात पीक विम्याचे पैसे आले का ते शेतकऱ्यांनी लगेच चेक करावे.

पीक विम्याची 25% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.  पावसाचा खंड तसेच काही ठिकाणी पिकाचे झालेले मोठे प्रमाणात नुकसान यामुळे शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम त्वरित जमा करण्याचे आदेश कृषी विभागाकडून देण्यात आले होते.

Leave a Comment