या दिवशी मान्सून धडकणार  महाराष्ट्रात :  पहा कोणत्या तारखेला कुठे-कुठे पोहोचणार मान्सून Monsoon Update 2024

Monsoon Update 2024 : आता नैऋत्य मान्सून वाऱ्याचे हालचालीचे संकेत मिळालेले आहेत.

 भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे.  कोणत्या तारखेला कुठे कुठे पाऊस होऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत.

यावर्षी 2024 ला मान्सूनची वाटचाल कशी असेल Monsoon Update 2024

 मे महिन्यात तीव्र उन्हाळा व उखाण्याचा सामना नागरिकांना करावा लागलेला आहे.  

 मान्सून 28 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहे.  नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जून पर्यंत देशाच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावतो मात्र सध्या तयार झालेल्या परिस्थितीमुळे तो त्यापूर्वीच म्हणजे 27 ते 28 मे दरम्यान केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदाचा मान्सूनचा प्रवास येथे पहा

त्यानंतर दहा ते बारा दिवसात तो अरबी समुद्रात व तिथून महाराष्ट्रात धडकेल असा अंदाज आहे. यानंतर आता मान्सूनचे लवकरच 10 ते 12 जून दरम्यान महाराष्ट्रात आगमन होऊ शकते.

 हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनच्या आगमन वेळेपूर्वी होत असून नागपुरात 12 जून पर्यंत मान्सूनच्या सरी बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Monsoon Update 2024

Leave a Comment