मोबाईल टावर लावा पैसे कमवा Mobile tower installation Process

तुम्हाला टॉवर लावण्यासाठी कुठेही पैसे देण्याची गरज पडत नाही, सर्व खर्च ही संबंधित कंपनी करते त्यामुळे जर कोणी टॉवर लावण्यासाठी पैसे मागत असेल तर कोणालाही पैसे देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, खाली दिलेल्या तीन-चार पद्धती ने तुम्ही घरावर किंवा मोकळ्या जागेवर टॉवर लावू शकता.

आवश्यक कागदपत्रे

स्टॅबिलिटी सर्टिफिकेट, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र, जागेचे कागदपत्र (सातबारा अथवा Index-2), कंपनी सोबतचा करारनामा.

मोबाईल टावर बसविण्यासाठी तुम्ही संबधित नेटवर्क कंपनीच्या ऑफिस मध्ये जाऊन भेट देऊ शकता. कुठल्याही ऑनलाईन प्रक्रिया किंवा फोन वरून येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. 

मोबाईल टावर च्या नावावर लोकांची पैसे घेऊन फसवणूक केली जात आहे. 

किती पैसे मिळतात

घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत ग्रामीण भागात तुम्ही टॉवर लावणार असाल तुम्हाला 7000 ते 50 हजाराच्या दरम्यान मोबदला मिळतो तर शहरी भागात तुम्ही टॉवर लावणारा असाल तर हा मोबदला 50 हजार ते 1.5 लाखाच्या दरम्यान तुम्हाला मिळू शकतो.