Land Record Document in 25 rupees : महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे जमीन संबंधित विविध कागदपत्रे काढण्यासाठी आता फक्त 25 रुपयात अर्ज करता येणार आहे.
जमिनीची कागदपत्रे जसे की फेरफार बोजा कमी करणे डिजिटल सातबारा वारस नोंद करणे जमीन नावावर करणे इत्यादी कामे करण्यासाठी आता फक्त 25 रुपयात शेतकऱ्यांना किंवा जमीन धारकांना अर्ज करता येणार आहे.
आपले सरकार सेवा केंद्रावर अर्ज करताना फक्त पंचवीस रुपये शुल्क आकारून खालील विविध गोष्टींसाठी व कागदपत्रांसाठी अर्ज करता येईल
- ई करार
- बोजा दाखल करणे गहाण खत
- बोजा कमी करणे,
- वारस नोंद
- मयताचे नाव कमी करणे
- अपाक शेरा कमी करणे
- एकत्र कुटुंब प्रमुख नोंद कमी करणे
- विश्वस्तांचे नाव बदलणे
महत्त्वाची जमीन कागदपत्रे मोबाईलवर पहा
जमिनी संबंधित विविध कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. महसूल विभागाकडून आता डिजिटल स्वरूपात कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.