लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज : ladaki Bahin Yojana Online Apply

ladaki Bahin Yojana Online Apply : नमस्कार मित्रांनो,  राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचे अर्ज गावोगावी भरून घेतले जात आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्ले स्टोर वरून नारीशक्ती दूत नावाचे ॲप डाऊनलोड करा. अर्ज भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुमचा अर्ज सबमिट करा.

लाडकी बहीण योजना यादी ladaki Bahin Yojana Yadi 

पहिल्या टप्प्यात भरलेल्या अर्जाची यादी प्रकाशित केली जाणार आहे. ही यादी अंगणवाडी तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे नागरिकांना पाहायला उपलब्ध असेल. 

लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये जर काही हरकती असतील तर तुम्ही त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरती तक्रार करू शकता. 

तक्रारीची मुदत संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची  पहिल्या टप्प्यातील अंतिम यादी तयार होईल.

 याद्या येथे पहा 

लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे : Documents

अधिवास प्रमाणपत्र : अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या ऐवजी जन्म दाखला किंवा टीसी देऊ शकता.  आणि तेही नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचा कुठलाही एक पुरावा जसे की पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देऊन तुम्ही अर्ज भरू शकता.

उत्पन्न प्रमाणपत्र : अडीच लाख रुपये पर्यंतच्या आत मधील उत्पन्न प्रमाणपत्र या योजनेसाठी लागणार आहे.  परंतु जर तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही त्या ऐवजी तुमच्याकडे असलेले पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देऊ शकता.

आधार कार्ड : लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे कारण लाडकी बहीण योजनेमधून दिले जाणारे दीड हजार रुपये आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दिले जाणार आहे.

बँक पासबुक : लडकी बहीण योजनेसाठी  महिलेचे  वैयक्तिक बँक खाते असायला हवे.  लाडके बहीण योजनेचा अर्ज भरताना हे बँक पासबुक ॲप मध्ये अपलोड करायचे आहे.

हमीपत्र : लाडकी बहीण योजनेसाठी एक हमीपत्र देण्यात आली आहे हे आम्ही पत्र डाऊनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढावी लागणार आहे.  त्यावर दिलेल्या सर्व नियम अटी मान्य असल्याबाबत खात्री करायची आहे व त्यावर सही करून हे आम्ही पत्र ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करावे लागणार आहे.

फोटो : या योजनेचा अर्ज भरण्यासाठी एक पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.  किंवा जर तुम्ही नारीशक्ती दूध ॲप मध्ये ऑनलाईन अर्ज भरत असाल तर तुम्हाला लाईव्ह फोटो काढून देखील अर्ज भरला जाऊ शकतो.

अर्ज कसा भरावा पहा 

 

Leave a Comment