Breaking News : शेतकरी हितासाठी , राज्यातील ऊस वाहतुक बंद पाडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा …

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या –

यंदाच्या वर्षीच्या ऊसाची एफ आर पी ही मागील वर्षापेक्षा दोनशे रुपयांनी वाढवावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मांडली. यासोबतच हंगाम संपल्यावर 350 रुपये द्यावेत असे सुद्धा सांगितले.

ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा त्यांनी केला –

पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल –

जोपर्यंत आम्ही मांडलेल्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. असा इशारा त्यांनी दिला. अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद पूर्ण झाली. यावेळी शेट्टी यांनी या मागण्या मांडल्या. दरम्यानच सरकारने जर या मागण्यावरती गांभीर्याने लक्ष दिले नाही तर सतरा – अठरा नोव्हेंबरला राज्यामधील ऊस वाहतूक बंद पडणार असा इशारा सुद्धा शेट्टी यांनी केलेला आहे.

सात नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्तालयावर आम्ही भव्य मोर्चा काढणार आहे. असा इशारा सुद्धा राजू शेट्टी यांनी दिला. सरकारने जर गांभीर्याने लक्ष नाही दिले तर 17 – 18 नोव्हेंबरलाच राज्यातील ऊस वाहतूक आम्ही बंद पाडणार. ऊस दराच्या मागणी सोबतच कारखानदार शेतकऱ्यांचा ऊस काट्यांमध्ये लुटत असतात असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे.

राज्यातील साखर कारखान्या मधील काटे ऑनलाइन पद्धतीने करावे. यासोबतच साखर कारखान्याच्या काठ्यावर साखर आयुक्त चे नियंत्रण असावे. अशा विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये साखर आयुक्तालयावर लवकरच भव्य मोर्चा काढण्यात येईल.

मुकादम व्यवस्था संपवावी –

हल्ली आता कारखान्यांकडून होतच आहे पण मुकदमांकडून सुद्धा शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे मुकादम व्यवस्था संपवावे यामध्ये बांधकाम मजुरांना महामंडळाने ऊस तोडणी करिता पुरावे द्यावेत. मुकदम कारखाना यासोबतच शेतकरी यांची फसवणूक सुद्धा करतात. असे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळे मुकदम ही व्यवस्था संपवावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.

साखरेच्या एफआरपी संदर्भात केंद्र शासनाकडून कोटा पद्धत लागू असो किंवा नसो मात्र शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही वेळेवरती द्यावेत. केंद्रासोबत तुम्ही किती भांडायचे तेवढे भांडा आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येईल असा टोला राजू शेट्टी यांनी विरोधकांना दिला.

शेतकऱ्यांवर कोणाचे लक्ष नाही –

राज्यामधील सत्ताधारी यासोबतच विरोधक दोघांचेही अलीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजिबात लक्ष नाही. सत्ताधारी मंडळी नुसतेच भांडणात मग्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीच ठरवावे आपण कुठे पाऊल टाकावे ते. मागील पंचवीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच शेतकऱ्यांबद्दल शासनाची एवढी असंवेदनशीलता या सोबतच बेजबाबदार पणा आत्ताच पाहायला भेटत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अशी टीका सध्याच्या शासनावर केली असून आता शेतकऱ्यांच्या ह्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात तरच शेतकरी शांत बसतील नाहीतर शेतकरी शांत बसणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी कारखानदारांना केला.

Leave a Comment