शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासकीय अनुदान ! लाभ घेण्यासाठी अर्ज : Goat Farming Loan Yoajan

शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी Goat Farming Loan Yoajan तसेच पशुसंवर्धनासाठी शासकीय अनुदान शेतकऱ्यांना प्रदान करत आहे. पशुसंवर्धन व्यवसायामध्ये कमी खर्चात अगदी चांगल्या प्रकारे चालणारे व्यवसाय म्हणजे शेळीपालन होय. या व्यावासातून शेतकऱ्यांना आर्थिक साह्य मिळत आहे.

ज्या शेतकरी बंधू भगिनींना स्वतःचा शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी शासनाने राबवलेल्या योजनेच्या माध्यमातून शेळीपालन व्यवसाय सुरू करावा. पण शासनामार्फत राबवलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामध्ये अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, योजनेसाठी पात्रता, शासनाचा या योजनेअंतर्गत उद्देश अशा प्रकारे सविस्तर माहिती आज आपण आजच्या लेखामध्ये बघणार आहोत.

अर्ज प्रक्रिया येथे पहा 

◇ योजनेचा लाभ घेण्याकरिता अटी व नियम

:- ज्या शेतकरी बंधू-भगिनींना स्वतःचा शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे त्या शेतकऱ्यांजवळ स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे. ती जमीन पानस्थळ असावी. त्या शेतामध्ये शेड बांधून शासनामार्फत राबवलेल्या या योजनेचा लाभ मिळवून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाच बोकड व 100 शेळ्या पर्यंत घेऊन शेळी पालन व्यवसाय सुरू करू शकतात.

:- शेतकरी मित्रांनो शेळी पालन व्यवसाय सुरू करत असताना शेळ्यांच्या चाऱ्याची योग्य सोय व शेळीच्या निगाची योग्य सोय असणे आवश्यक आहे. खाद्य चारा यासाठी शेतकऱ्यांकडे योग्य ती जमीन असने आवश्यक आहे.

:- शेळीपालन व्यवसाय सुरू करत असताना 100 शेळ्या आणि पाच बोकडे एवढ्या प्राण्यांसाठी शासन अनुदान देत आहे. याकरिता अर्जदाराकडे जवळपास 9000 स्क्वेअर मीटर एवढी जमीन असावी.

:- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला शंभर शेळ्या व पाच बोकड घेण्याकरिता दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

:- लाभार्थी शेतकरी बंधू-भगिनींनी गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेतले असेल तर त्याकरिता कर्जाचा पुरावा देणे आवश्यक आहे.

◇ या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही पात्रता असेल,

• या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकरी घेऊ शकणार आहे,

• अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकरी बंधू-भगिनींना महाराष्ट्र शासन या योजनेच्या माध्यमातून कर्ज देत आहे,

• जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेळीपालन करत आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात येईल,

• शेळीपालनाचा संपूर्ण अनुभव शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. तरच शासन शेतकऱ्यांना अनुदान देईल.

• यासोबतच अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बंधू भगिनी करिता जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असणार आहे.

◇ शासनाने राबविलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१) मोबाईल नंबर
२) मतदार ओळखपत्र
३) जमीन दस्तऐवज
४) पत्त्याचा पुरावा
५) वार्षिक उत्पन्न दाखला
६) आधार कार्ड
७) बँक खाते पासबुक
८) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी जातीचे प्रमाणपत्र
९) पासपोर्ट आकाराचे फोटो
१०) रहिवासी दाखला

शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा आहे. हा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

http://mahamesh.co.in/

Leave a Comment