आता गाय म्हैस गोठ्यासाठी सव्वा दोन लाखांचे अनुदान : फक्त हे कागदपत्रे आवश्यक Gai Gotha Anudan Yojana

By Krushi Market

Published on:

Gai Gotha Anudan Yojana

Gai Gotha Anudan Yojana शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी मोठी बातमी समोर येत नाही गोठ्यासाठी सव्वा दोन लाख रुपये पर्यंतचा अनुदान या ठिकाणी शासनाकडून मिळणार यासाठी अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

शरद पवार ग्राम-समृद्धी योजनेतून राज्य सरकार गाय-म्हैस गोठा बांधण्यासाठी मोठ अनुदान देत आहे, यासाठीच अर्ज कुठे आणि कसा करायचा ? या संदर्भातील कागदपत्रे ही संपूर्ण माहिती खाली जाणून घेऊया.

सदर योजनेचा जीआर 3 फेब्रुवारी 2021 ला शरद पवार ग्राम समृद्धी योजना म्हणून जाहीर करण्यात आली, यामध्ये गोठा बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत देण्यात येणार आहे, शेळीपालन, कुक्कुटपालन, आणि पशुपालन, करणाऱ्यांसाठी ही योजना आहे.

Gai Gotha Anudan Yojana योजनेचे फायदे काय ?

आधुनिक पद्धतीने गोठा बांधामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले तसेच दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते,पशुधनासाठी निगा राखणे सोपे होते, गोठा बांधकामासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागणार नाही अनुदानामुळे शेतकऱ्यांना येणारा आर्थिक बोजा कमी होणार आहे.

हे पण वाचा :- शासनाकडून खुशखबर : नवीन घरकुलासाठी आता इतके अनुदान अतिरिक्त मिळणार पहा तुम्हाला किती मिळेल 

गाय म्हैस गोठासाठी अर्ज कसा करायचा?

सदर योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सेवा सध्या उपलब्ध नाहीत, ऑफलाईन माध्यमातूनच शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालय मार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे सदर अर्ज हा सादर करून घ्यावा लागतो. यामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ही तुम्हाला गाय गोठ्यासाठी किंवा असे शेळी पालनसाठी अर्ज करता येतो.

गाय गोठा घेण्यासाठी कागदपत्रे काय लागतात?

योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सदर योजनेतून तुमच्याकडे आवश्यक असलेली कागदपत्रे असेल तर लाभ घेता येतो, शेतकऱ्यांजवळ सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पशुधन असल्याचा पुरावा, जागेची मालकी हक्काचे कागदपत्रे ही सादरी करावी लागतात.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना दिवसा वीज : सोबतच 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

गाय गोठ्यासाठी किती अनुदान मिळतं?

दोन ते सहा जनावरांचा गोठा घ्यायचा असेल तर यासाठी गोठा बांधकामा करिता 69 हजार 188 रुपये शासनाकडून अनुदान मिळतं सहा ते बारा जनावरांच्या गोठ्यासाठी जनावरांच्या गोठ्यासाठी दुप्पट अनुदान मिळतं जसे की एक लाख 54376 रुपये तेरा पेक्षा अधिक जनावरांसाठी 13 ते 18 या जनावरं करिता दोन लाख 31 हजार 564 अनुदान मिळते.

गाय गोठ्यासाठी कुणाला अर्ज करता येतो?

गाय गोठयासाठी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी असणे आवश्यक आहे, स्वतःकडे स्वतःची जागा आवश्यक याशिवाय पशुधन पालनाचा अनुभव ग्रामीण भागातील पशुपालकांना सदरील योजनेचा लाभ मिळतो आता या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये देखील मिळू शकते किंवा तुम्ही youtube व्हिडीओ सर्च करू शकतो. 

1 thought on “आता गाय म्हैस गोठ्यासाठी सव्वा दोन लाखांचे अनुदान : फक्त हे कागदपत्रे आवश्यक Gai Gotha Anudan Yojana”

  1. मला पशुपालन करायचे आहे, व त्या साठी लागणाऱ्या गोट्यासाठी कर्ज घ्यायचे आहे. मार्गदर्शन सहकार्य हवे आहे

    Reply

Leave a Comment