Solapur Breaking : शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणींचा समोर येतात. प्रामुख्याने पाण्याची समस्या तसेच विजेच्या समस्येसेनाचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी अजूनही पुरेशी विजेची सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतकरी बांधवांना वीज उपलब्ध होते मात्र वीज हीं दिवसा न उपलब्ध होता रात्री जास्त करून उपलब्ध होते.
त्याचप्रमाणे सध्या उपलब्ध असलेली वीज ही 12 तास उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत सर्वच शेतकरी बांधवांना शेती करताना मोठया वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एका कार्यक्रमामध्ये यांनी दिवसा शेतकरी बांधवांना बारा तास वीज उपलब्ध करून देण्यात येईल असा सरकारचा मानस असल्याचे बोलून दाखवले गेले आहे. यासाठी विजेचे फिडर सौरऊर्जेवर आनायचे असल्याचे फडणवीस यांनी नमूद केलेले आहे.
यातून जवळपास चार हजार मेगावॅट विजेचे उद्दिष्टे असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे विविध विकास कामांच्या ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी फडणवीस शेतकऱ्यांसोबत बोलत होते. तसेच फडणवीस यांनी राज्य शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली आहे. फडणवीस यांनी त्यावेळी सांगितले की, सोलर फिडर साठी आतापर्यंत जागेची समस्या शासनाला भासवत होती.
मात्र आता शासनाने सोलर फिडर साठी शेत जमीन भाडेतत्त्वावर घेण्यास सुरवात केलेली आहे. तसेच शासनाकडून सोलर फिडर साठी 75 हजार रुपये हेक्टरी प्रति महिना या दराने शेतकऱ्यांकडून शेत जमीन सोलर फिडर साठी भाडेतत्त्वावर घेतली गेली जाणार आहे. एवढेच नाही तर तीस वर्षानंतर संबंधित शेतकरी बांधवांना त्यांची शेत जमीन परत केली जाणार आहेत.
निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळणार आहेत त्याचप्रमाणे वीज निर्मितीसाठी देखील शेतकऱ्यांचे सहकार्य खूप लाभणार आहे. शेतकरी बांधवांना वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिवसा 12 तास वीज उपलब्ध होण्यास मदत होईल .त्यावेळी फडणवीस यांनी असे सांगितले की अतिवृष्टी नुकसान भरपाई आत्तापर्यंत शेतकरी बांधवांना 65 मिलीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर नुकसान भरपाई साठी पात्र समजले जात होते.
मात्र, आता वर्तमान राज्य शासनाने ही अट थांबवून आता सतत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देण्यास मदत केली आहे. कायमच्या पावसामुळे नुकसान झालेले मात्र 65 मिलीच्या अटीमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगितले गेलेले आहे. बार्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांना यावर्षी 80 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी तालुक्यातील उपसा सिंचन योजनेची माहिती दिली गेली आहे. बार्शी तालुक्यातील उपसा सिंचन या योजनेसाठी 700 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. यामुळेच तालुक्यातील बारा हजार 250 हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहेत. या उपसा सिंचन प्रकल्पला जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यात येणार आहे. यामुळे देवेंद्र फडवणीस यांनी तालुक्यातील विकासाला हातभार लागणार असल्याचे नमूद केले आहे.
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : पिक विमा योजनेत होणार बातमी : Crop Insurance Rule Change
- महिलांना मोफत ३ सिलेंडर : असे मिळणार येथे अर्ज करा | 3 Free Gas Cylinder Apply
- तुमच्या गावाची घरकुल यादी पहा Gharkul List Download in Mobile | Gharkul Yadi 2025 | PMAYG Pradhanmantri Awas Yojana Gramin
- 100 रु. मध्ये जमीन नावावर करा : Land Registration online process
- फ्री मे ऐसे चेक करें अपना सिबिल स्कोर : Cibil Score check Free