ई पीक पाहणी झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई : E Pik Pahani App Version 2 and Crop Insurance

E Pik Pahani App Version 2 : अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  खरीप हंगामाच्या शेवटी व रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस पडल्याने दोन्ही पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणारे नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम Crop Insurance मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी रब्बी  पिकांची पीक पाहणी करणे आवश्यक आहे. E Pik Pahani App Version 2 Download  हे ॲप डाऊनलोड करून रब्बीची ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी स्वतः करून घ्यावी.

रब्बी पिकांची पाहणी करण्यासाठी प्ले स्टोअर वरती पिक पाहण्याचे नवीन ॲप उपलब्ध आहे.  सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणीचे व्हर्जन टू डाऊनलोड करून घ्यावे.

रब्बी ई-पीक पाहणी- येथे करा 

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस, गारा, वादळ वारा इत्यादीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.  मका, सोयाबीन, कापूस, कांदे इत्यादी पिके नुकसानग्रस्त झाल्यामुळे त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळणे गरजेचे आहे.

नुकसान भरपाई व पिक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली बाजू पक्की व्हावी यासाठी ई पीक पाहणी करून ठेवणे आवश्यक आहे.  ई पीक पाहणी ॲप मध्ये आपल्या शेतात असलेली पिके सातबारावर नोंदविली जाते.

सातबारावर पिकांची नोंद झाल्यामुळे आपल्या शेतात कुठली पिके आहेत यावरून आपल्याला दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम व पिक विम्याची रक्कम ठरवली जाऊ शकते.  

ई पीक पाहणी द्वारे शासनाला तुमच्या शेतामध्ये कोणती पिके आहेत याची माहिती मिळते व त्या पिकांचे झालेल्या नुकसानामुळे द्यावयाची रक्कम देखील समजते.

pik vima भरपाई वाटप येथे पहा 

Leave a Comment