Driving License Apply New Process : लायसन काढण्यासाठी आरटीओ मध्ये जाण्याची गरज पडणार नाही एक जून 2024 पासून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमांमध्ये अशा प्रकारचे बदल करण्यात आलेले आहेत.
ज्यामुळे ड्रायव्हिंग लायसन काढणे ही एक सोपी प्रक्रिया देखील होणार आहे. परंतु ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी कुठल्याही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन देखील दिले जाईल.
परंतु ड्रायव्हिंग लायसन मिळण्यापूर्वी प्रशिक्षण सेंटर किंवा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये काही नियम अटींचे पालन करावे लागणार आहे.
आता ड्रायव्हिंग लायसन
ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा. त्यानंतर तुम्हाला लर्निंग ड्रायव्हिंग लायसन लगेच काढता येईल.
नवीन नियम काय आहेत Driving License Apply New Process
ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी खालील पद्धतीने पैसे भरावे लागणार आहे.
- लर्निंग लायसन्स साठी 150 रुपये
- लर्निंग लायसन टेस्ट शुल्क 50 रुपये
- ड्रायव्हिंग लायसन टेस्ट 300 रुपये
- ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी 200 रुपये
- लायसन नूतनीकरण करण्यासाठी 200 रुपये
ड्रायव्हिंग लायसन आता तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूल मधूनच मिळेल परंतु त्यासाठी ड्रायव्हिंग स्कूल कडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी देखील तुम्हाला जागा असणे आवश्यक आहे
ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षक हा किमान बारावी उत्तीर्ण असला पाहिजे
प्रत्येक वाहनासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणाचा कालावधी असेल.
ड्रायव्हिंग स्कूलने विद्यार्थ्यास संपूर्ण कालावधी मध्ये ड्रायव्हिंग शिकवणे बंधनकारक आहे.