लगेच करा – खरीप व रब्बी पिक विमा क्लेम.. Crop Insurance claim app

सर्वप्रथम ‘Google Play Store’ वर जाऊन ‘Crop Insurance’ ॲप डाऊनलोड करून घ्या.

ॲप्लिकेशन उघडल्यानंतर, Change Language वर क्लिक करून भाषा निवडू शकता.

यानंतर, ‘नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा’ वर‌ क्लिक करा.

यापुढे, ‘पीक नुकसानीची पूर्व सूचना’ पर्यायावर क्लिक करा.

आता मोबाईल क्रमांक टाकून जो ओटीपी आला तो टाकून घ्या. (Crop Insurance Claim)

यापुढे, खरीप किंवा रब्बी हंगाम निवडा, वर्षं, योजना, राज्य निवडून खालील हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.

आता पीक नुकसानीच्या घटना नोंदविण्यासाठी घटनेचा प्रकार, पीक वाढीचा टप्पा, नुकसानीची टक्केवारी, नुकसानीचा फोटो आणि व्हिडिओ अपलोड करा.

सर्व माहिती भरल्यानंतर, ‘सबमिट’बटणावर क्लिक करा. तुमचा क्लेम यशस्वीपणे पूर्ण होईल.

तसेच तुमच्यासमोर ‘Docet ID’ येईल, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा.

 या डॉकेट आयडीद्वारे तुम्हाला पीक नुकसानीची स्थिती बघता येईल. (Pik Vima Claim Online)

Leave a Comment