Agriculture Loan : आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश मानला जातो. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या जवळजवळ 70% ही शेती या व्यवसायावर आधारित आहे. खरं पाहता शेती करताना शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो. शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना भांडवलाची आवश्यकता ही खूप असते.
मात्र अनेकदा असे होते की शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने त्यांना शेती करण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांना खूपच कमी प्रमाणात उत्पन्न मिळते. अशा परिस्थितीत कर्ज फेडणे तर सोडाच शेतकरी बांधवांना स्वतःच घर चालवणे देखील खूप कठीण बनते. यामुळे शेतकरी बांधवाच्या डोक्यावर कर्ज हे कायमच राहते. परिणामी देशात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढतच आहे आणि ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे.
महाराष्ट्रात तर सर्वाधिक शेतकऱ्यांचा आत्महत्या होत असतात. दरम्यान आता शेतकरी बांधवांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार आज पासून नाशिक जिल्हा बँक शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करण्यास सुरवता करणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या अडचणीत अजूनच वाढ होण्याची दाठ शक्यता आहे. मित्रांनो खरं पाहता नाशिक जिल्ह्यातील बऱ्यापैकी शेतकरी बांधव हे नाशिक जिल्हा बँकेतून कर्ज घेत असतात. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक निश्चितच एक चिंताजनक बातमी ठरली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीतून या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नाशिक जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या परंतु कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकरी बांधवांकडून आता कर्जाची वसुली ही केली जाणार आहे. यासाठी नाशिक जिल्हा बँकेकडून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. मित्रांनो खरं पाहता नाशिक जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती ही डबघाईला आल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बँकेला सावरण्यासाठी कर्जाची वसुली करणे हे अतिशय आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे परंतु यामध्ये शेतकऱ्याचे मोठे हाल होणार आहेत.
यामुळे बँकेकडून आजपासून कर्ज वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. बँकेची आर्थिक पत वाढवण्यासाठी बँक प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करत असल्याचे सांगितले गेले आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, नाशिक जिल्हा बँकेची 2156 कोटी रुपयांची रक्कम वसुलीची बाकी राहिलेली आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 1452 कोटी रुपये एवढी रक्कम जुनी थकबाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा बँकेकडून आता कर्जाची वसुली केली जाणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान नाशिक जिल्हा बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांना आता ह्या कर्जाची परतफेड करणे अनिवार्य असणार आहे. निश्चितच शेतकरी बांधवांनी कर्ज परतफेडी बाबत सकारात्मक विचार करणे आवश्यक झालेले आहे. दरम्यान शेतकरी बांधवांच्या मते यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि नंतर परतीच्या पावसामुळे हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
यामुळे हाती अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळाले आहे. अशा परिस्थितीत बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान कर्ज वसुलीबाबत नाशिक जिल्हा बँक कितपत ताठर भूमिका घेईल हे बघण्यासारखे राहणार आहे..
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : पिक विमा योजनेत होणार बातमी : Crop Insurance Rule Change
- महिलांना मोफत ३ सिलेंडर : असे मिळणार येथे अर्ज करा | 3 Free Gas Cylinder Apply
- तुमच्या गावाची घरकुल यादी पहा Gharkul List Download in Mobile | Gharkul Yadi 2025 | PMAYG Pradhanmantri Awas Yojana Gramin
- 100 रु. मध्ये जमीन नावावर करा : Land Registration online process
- फ्री मे ऐसे चेक करें अपना सिबिल स्कोर : Cibil Score check Free