नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज कांदा चाळ अनुदान योजनेविषयी माहिती या लेखामध्ये पाहणार आहे. या मध्ये आपण योजनेचे उद्दिष्ट काय आहे, या योजनेचा लाभ कोणी कोणी घेऊ शकतात, त्यांची आवश्यक पात्रता काय आहे, अनुदान किती मिळू शकते, लाभार्थी निवडीचे निकष कोणते, अर्ज कुठे करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या लेखांमध्ये मिळणार आहेत. तरी आपण हा लेख संपूर्णपणे नीट वाचुया.
Kanda Chal Anudan Yojana 2022
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून शेतकरी स्थानिक रित्या तयार केलेल्या चाळीमध्ये या पिकाची साठवणूक करतो. त्यामुळे कांदा जास्त प्रमाणावर नसतो आणि त्याचे नुकसान ही होते. त्यामुळे कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावर त्याचा परिणाम होतो. यामुळे चाळीच्या उभारणीमुळे कांद्याची प्रत राखली जाते आणि तो कांदा जास्त दिवस टिकला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा बरासा नफा मिळतो. त्यामुळेच कांदाचाळ उभारणी कडे बऱ्याच शेतकऱ्याचा कल हा वाढत असताना दिसून येतो.
कांदा चाळ अनुदान किती?
कांदा चाळीसाठी शासनाकडून आपल्याला आर्थिक मदत म्हणून ५, १०, १५, २० व २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभा करण्यासाठी खर्चाच्या ५०% व कमाल ३,५००/- रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार मदत दिले जाते.
कांदा चाळ अनुदानाचे उद्दिष्ट काय आहेत?
शेतकऱ्याला कांदा चाळ उभारल्याने कांदा उत्पादनाचे नुकसान कमी होईल आणि अधिक नफा मिळवता येईल.
हंगामानुसार कांद्याची आवक वाढून कांद्याचा भाव कोसळला जाऊ शकतो.याचप्रमाणे हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा पडून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतो. अशा समस्येवर अंशतः नियंत्रण मिळवणे.
साठवणूक करून कांद्याचा अधिक नफा मिळवणे
कांदा चाळ अनुदान योजनेची पात्रता
अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतकऱ्याला स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक असणे गरजेचे आहे.
तसेच ७/१२ उतारा वर नोंद असणे ही आवश्यक आहे.
अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे खूप गरजेचे आहे.
कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो?
वैयक्तिक शेतकरी कांदा उत्पादक
शेतकऱ्यांचा गट स्वयंसहाय्यता गट
शेतकरी महिलांचा गट
शेतकरी उत्पादक संघ
शेती संबंधित नोंदणीकृत संस्था
सहकारी शेतकऱ्यांची संस्था
सहकारी पणन संघ
आवश्यक लागणारी कागदपत्रे –
सातबारा उतारा
आधार कार्ड छायांकित प्रत
आधार कार्ड संलग्न बँक खात्याच्या पासबुकीचा पहिल्या पानाची छायांकित प्रत
संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांसाठी)
विहित नमुन्यातील हमीपत्र क्रमांक 2 (प्रपत्र २)
अर्ज कुठे व कसा करावा
या अनुदान योजने अंतर्गत लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि पात्र अर्जदारांनी या योजनेसाठी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाइन संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
रजिस्ट्रेशन करत असताना आवश्यक असणारी सर्वच कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करून घ्यावी.
पूर्व संमती पत्र आलेल्या शेतकऱ्याला सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र ४ बंध-पत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या समोर कार्यालयांमध्ये सादर करून घ्यावे आणि पूर्वसंमती आराखड्यात दिलेल्या पत्रासोबत तसेच तांत्रिक निकषानुसार कांदा चाळीची उभारणी करणे हे बंधनकारक आहे.
तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करने हे अत्यंत गरजेचे आहे.
कांदाचाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना लेखी स्वरुपात कळवने देखील अधिक गरजेचे आहे.
आम्ही या लेखाद्वारे तुम्हा सर्वांना कांदा चाळ अनुदान योजने विषयी संपूर्ण आणि सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी कार्यालयात जाऊ संपर्क करावा आणि तुमच्या शंकांचे निरसन देखील करावे.
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : पिक विमा योजनेत होणार बातमी : Crop Insurance Rule Change
- महिलांना मोफत ३ सिलेंडर : असे मिळणार येथे अर्ज करा | 3 Free Gas Cylinder Apply
- तुमच्या गावाची घरकुल यादी पहा Gharkul List Download in Mobile | Gharkul Yadi 2025 | PMAYG Pradhanmantri Awas Yojana Gramin
- 100 रु. मध्ये जमीन नावावर करा : Land Registration online process
- फ्री मे ऐसे चेक करें अपना सिबिल स्कोर : Cibil Score check Free