Vihir Anudan Yojana 2025 शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये पर्यंतचा अनुदान मिळणार आहे, विहीर अनुदान कशा पद्धतीने मिळणार ? ही प्रक्रिया काय आहे आपण आज जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना विहीर देण्यासाठी मोठे अनुदान देण्याचे सुरुवात केलेली आहे आता हे अनुदान कसे मिळवायचे ? आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान मिळतं यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मनरेगा माध्यमातून ही सिंचन विहीर करण्यासाठी 4 लाख एवढा अनुदान मिळते. याबाबतचा जीआर 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आला.
महाराष्ट्रात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य असल्याचा भूजल संरक्षण विकासाने सांगितले. विहिरीसाठी अनुदान किती मिळत.? असेल तर यासाठी काय पात्रता आहे तर पाहूया. योजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारांनी प्राधान्य क्रमांकाने विहीर मंजूर करून मिळते.
Vihir Anudan Yojana 2025 Deatils
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
भटक्या जमाती
विमुक्त जाती
दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी
स्री करता असलेली कुटुंबे
विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे
जमीन सुधारण्याचे लाभार्थी
इंद्रा आवास योजना
सीमांत शेतकरी अडीच एकर पर्यंत शेतजमीन
अल्पभूधारक शेतकरी