Ladaki Bahin Yojana Rejected List: लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती त्यावेळेस महिलांकडून एक हमीपत्र भरून घेण्यात आले होते. ज्या महिला लाडकी बहीण योजनेत पात्र नाहीत अशा महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत.
त्यामुळे राज्य शासनाकडून अपात्र महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून काढून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
खालील महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत Ladaki Bahin Yojana Rejected List
ज्यांचे वय 21 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त आहेत अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत.
ज्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा महिला देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत.
पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांचे पैसे लाडकी बहीण योजनेच्या योजनेमधून समायोजन करून पैसे कमी करण्यात येणार आहेत.
ज्या महिलांकडे किंवा ज्या महिलांच्या पतीकडे चार चाकी गाडी आहेत अशा महिला देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे.
वरील अटींमध्ये ज्या महिला बसत नाही अशा महिला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहेत अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे.