Ladaki Bahin 7th installment लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड

By Krushi Market

Published on:

Ladaki Bahin 6th installment 

Ladaki Bahin 7th installment : लाडकी बहीण योजनेचा 7 हप्ता याच आठवड्यात जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात  येणार आहे.

महिला व बालविकास विभागाच्या खाते वाटप झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे येण्याची  वाट मोकळी झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच महिलांच्या खात्यात पैसे ठेवले जातील असे सांगितले होते. आता पुन्हा एकदा महिला व बालविकास विभाग आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

 त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या याच आठवड्यामध्ये लाडके बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत.

१५०० मिळणार की २१००  ?

डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा केला जाणार असल्या बाबतची मोठी बातमी समोर येत आहे. २१०० रुपये मिळण्यासाठी अजून महिलांना वाट पाहावी लागणार आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कदाचित महिलांच्या खात्यात २१०० रुपये मिळू शकतात.

आता महिलांना करता येणार विश्वकर्मा योजनेत नोंदणी 

PM योजना अर्ज येथे करा 

Leave a Comment