Kharip Biyane Anudan 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 सुरू आहे. पेरणीसाठी लागणारे बियाणे शासनाकडून अनुदानित तत्त्वावर दिले जातात.
यामध्ये कापूस, मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी बियाणांचा समावेश आहे. या सर्व पिकांची संकरित वाण शासनाकडून अनुदानित तत्त्वावर मिळणार आहे.
कापसाचे बीटी वाण, व इतर पिकांचे सर्व हायब्रीड संकरित वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
खरीप हंगाम 2024 साठी बियाणं अनुदान साठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
Kharip Biyane Anudan 2024 Document
- आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ प्रमाणपत्र
- ८-ए प्रमाणपत्र
- Adhaar Card
- Bank passbook
- Mobile Number
अनुदानासोबतच खालील बाबींसाठी देखील अनुदान दिले जाते Kharip Biyane Anudan 2024
- सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्यक्षिके – रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान.
- आंतर पिक प्रात्यक्षिक – रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान.
- पिक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके – रु.15000 प्रती हेक्टर अनुदान.
- प्रमाणित बियाणे अनुदान वितरण
- या योजनेत 10 वर्षाच्या आतील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे किमतीच्या 50 % किंवा कमाल रु.5000 प्रती क्विंटल अनुदान.
- 10 वर्षाच्या वरील प्रमाणित बियाणे वितरण – किमतीच्या 50% किंवा कमाल रु.2500 प्रती क्विंटल अनुदान.
- बियाणे उत्पादनास अर्थ सहाय्य (10 वर्षाच्या आतील बियाणे) साठी रु. 2500 प्रती क्विंटल असे अनुदान दिले जाते.
डीबीटी पोर्टलवर खालील बाबींसाठी अनुदान उपलब्ध आहे.
1) पिक प्रात्यक्षिके साठी १०० %
2) आंतर पिक प्रात्यक्षिक
3) पिक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके
4) अधिक उत्पादन देणारे प्रमाणित बियाणे वितरणसाठी अनुदान