प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील उर्वरित रक्कम अग्रीम पिक विमा वाटपाचे काम वेगाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सूचना दिल्या आहेत.
आतापर्यंत 47 लाख 63 हजार पिक विमा अर्जंना मंजुरी देण्यात आलेली आहे. 1954 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत.
पिक विमा वाटपाचा रकमेपैकी 965 कोटी रक्कम आतापर्यंत वाटण्यात आली आहे. उर्वरित अग्रीम पिक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेले आहेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 1 कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. यावर्षी खरीप हंगाम 2023 साठी पिक विम्याची रक्कम फक्त एक रुपया एवढीच ठेवण्यात आली होती.
पिक विमा पोटी राज्य शासनाला जवळपास 8 हजार कोटी रुपये विमा हप्त्यापोटी पिक विमा कंपन्यांना द्यावे लागणार आहेत. शेतकऱ्यांकडून जरी एक रुपया पिक विमा साठी घेतला असला तरी शासनाला एवढी मोठी रक्कम पिक विमा कंपनीच्या घशात घालावी लागणार आहे.