Crop Insurance District wise : पहिल्या टप्प्यात 35 लाख शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा वाटप करण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हा पिक विम्याची रक्कम कशी आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत.
उर्वरित शेतकऱ्यांना अंतरिम पीक विमा मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू आहे.
पिक विम्याची अंतरिम नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
परंतु बहुतांश पीक विमा कंपन्यांकडून या विरोधात राज्यस्तरावर अपील करण्यात आले होते. त्यामुळे राज्य शासनाकडून या अपीलांवरती जेव्हा सुनावण्या पूर्ण होतील त्या पद्धतीने पिक विमा वाटपाची कार्यवाही केली जाईल.
जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.