फक्त 25 रुपयात 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव : 18 दिवसात वारस नोंद Varas Nond Mahiti

By Krushi Market

Updated on:

Varas Nond Mahiti

Varas Nond Mahiti : आता तलाठी कार्यालयाला टाटा, वारस नोंद आणि 25 रुपयात सातबारा उताऱ्यावर तुमच्या नाव जोडले जाणार आहे. या संदर्भात नवीन अपडेट शासनाने दिलेली आहे, तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाहीये, सरकारने नवीन ई हक्क प्रणाली सुरू केली आहे, यात नागरिक 25 रुपये मध्ये घरबसल्या वारस नोंदणीसाठी अर्ज करू शकतात.

यावेळी वारस नोंद बरोबर भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे वारस नोंद म्हणजे काय ? याबाबत तुम्हाला माहिती असेलच तर या ठिकाणी मृत व्यक्तीच्या पती-पत्नी मुलगा किंवा मुलगी आणि आई यांना वारस म्हणून ही मालमत्ता हस्तांतरित करण्यात येते यालाच वारस नोंद असे म्हणतात.

वारस नोंदण्याचे ऑनलाइन प्रक्रिया आता सुरू झालेली आहे, शासनाने ही हक्क प्रणाली सुरू केली आहे, या ठिकाणी महाभुलेख महाराष्ट्र शासनाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे यावरती तुम्हाला नोंदणी करता येते. त्याठिकाणी खाते उघडल्यावर अर्जदार वारस नोंदणीसाठी फॉर्म भरावा लागतो, आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करावी लागते.

अर्ज केल्यानंतर अठरा दिवसाचा अर्जाची तपासणी केली जाते आणि आवश्यक कागदपत्र असल्यास सातबारा वारसाची नोंद या ठिकाणी केली जाते. अशी देखील माहिती या ठिकाणी समजून येत आहे, तर वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे कोण कोणती आहेत हे देखील समजून घ्या.

अधिकची माहिती येथे पहा

येथे ई-हक्क प्रणाली व्हिडीओ पहा

Leave a Comment