Saur Kumpan Yojana शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे, शेतकऱ्यांना आता 100% अनुदानावर सौर कुंपण दिले जात आहे, या योजनेचा 100% अनुदानावर लाभ कसा घ्यायचा आहे ? आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
वन्यप्राण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, त्याचबरोबर पशुधनावर होणारे हल्ले त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सौर कुंपण मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. याच अनुषंगाने या ठिकाणी सौर कुंपण घेण्यासाठी 100% अनुदान देण्याची योजनाची घोषणा करण्यात आली.
ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यातील देखील आली होती, शेतकऱ्यांना सौर कुंपण उपलब्ध करून देण्यात येत होते, अनेक अडथळे या योजनेत पाहायला मिळाली यापूर्वी या योजनेत 75% अनुदान होतं, जे जवळपास 15,000 अनुदान या ठिकाणी मिळत होत.
Saur Kumpan Yojana 2025
आता हे अनुदान 100% असल्याकारणाने 20 हजार रुपये पर्यंतचा अनुदान या ठिकाणी मिळणार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर श्यामप्रसाद जन वन विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कुंपण देण्याची बाबी समाविष्ट होती योजनेची मात्र महाराष्ट्रातील काही निवडक गावांमध्ये राबवली जाते.
हे पण वाचा :- मुख्यमंत्री फडणवीसांनी 2100 रुपये कधी मिळणार ? : या संदर्भात स्पष्टच सांगितलं
वन लगत जे काही क्षेत्र असेल त्या क्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येतो. आता गावांची यादी वेळोवेळी शासनाकडून प्रसारित करण्यात येते, आता अर्ज करण्याची प्रकिया काय ? सरकारच्या महाडीबीटी फार्मर पोर्टलवर जाऊन आपल्याला लॉगिनगरीद्वारे या ठिकाणी लॉगिन करायचे त्यानंतर अर्ज करा मध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली सौर कुंपण योजना अशी बाब दिसून येते.
त्यावरती देखील क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता, तुमच्या गाव या योजनेअंतर्गत समाविष्ट असेल तरच तुम्हाला या योजनेचा अर्ज सबमिट करता येतो. जे गावे या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत त्या गावातील शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे अशा महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.