नमस्कार मित्रांनो, सर्व पिवळ्या रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे.
यावर्षी दिवाळीमध्ये शासनाकडून आनंदाचा शिदा लाभार्थ्यांना मिळणार आहे. यावर्षी आनंदाच्या शिद्यामध्ये पोहे व मैदा या दोन वस्तूंचा नविन समावेश करण्यात आलेला आहे ही किट फक्त शंभर रुपयात मिळणार आहे.
तसेच दर महिन्याला मिळणाऱ्या रेशन धान्य ऐवजी तुम्ही आता तुमच्या खात्यावर रोख रक्कम घेऊ शकता. पिवळ्या रेशन कार्डधारकांना आता धान्य ऐवजी रोख रक्कम मिळणार आहे.
धान्य ऐवजी पैसे कुणाला मिळणार
महाराष्ट्र शासनाकडून रेशन धान्य ऐवजी लाभार्थ्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी नगर अमरावती व नागपूर विभागातील 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
रेशन धान्याऐवजी पैसे साठी नियम व अटी
- तुमच्याकडे राशन कार्ड चा ऑनलाईन बारा अंकी नंबर असायला हवा.
- तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार कार्ड रेशन कार्ड ची लिंक करण्यात यावी.
- जर एखाद्या सदस्याकडे आधार कार्ड नसेल तर त्याचे नवीन आधार कार्ड काढण्यासंबंधित सूचना तहसील कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत.
- हे पैसे कुटुंबातील महिला सदस्याच्या नावे उघडण्यात आलेल्या बँक खात्यात पाठवण्यात येईल.
ऑनलाईन रेशन कार्ड आहे का
रेशन धान्य ऐवजी पैसे मिळण्यासाठी हा अर्ज भरा
जर तुम्हाला रेशन धान्य ऐवजी पैसे हवे असतील तर विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये भरावा लागेल.
रेशन धान्य ऐवजी पैसे मिळण्याबाबतचा शासन निर्णय येथे डाऊनलोड करा