PM Kisan Yojana : खात्यात 2000 रुपये आले का? : लाभार्थ्यांचे यादी इथे तपासा

By Krushi Market

Published on:

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता या आज शासनाने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे, आणि यातच आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

2,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये आले आहेत की नाही की तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता ही माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आज 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसन योजनेचा 19वा हप्ता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप सुरु झालय.

PM Kisan योजनेचा 19वा हप्ता मिळवण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ही काय आहे आपण पाहूया, पीएम किसान योजनेचे लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही ही कसं पहायचं आहे याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिलेली आहे.

हे पण वाचा :- फक्त 25 रुपयात 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव : 18 दिवसात वारस नोंद जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PM Kisan Yojana 2025

  1. पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
  2. https://pmkisan.gov.in/
  3. यानंतर लाभार्थी यादी Beneficiary List तुम्हाला दिसून येईल 
  4. यावरती क्लिक करा यानंतर उजव्या बाजूला लाभार्थी यादी नावाचा टॅब दिसेल
  5. त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, गाव ही निवडा 
  6. त्यानंतर वेबसाईटवर संबंधित पर्यायावरून आपले राज्य जिल्हा उपजिल्हा तालुका ब्लॉक गाव निवडा 
  7. अहवाल गेट रिपोर्ट यावर क्लिक करा 
  8. सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट बटनवर क्लिक करून तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून येईल 

तुम्हाला कोणता हप्ता किती तारखेला किती वाजता युटीआर नंबर माहिती मिळेल जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर तुमचे तहसील कार्यालय किंवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क करायचा आहे, तर दुसरा पर्याय आहे पीएम किसानचा हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 011-24300606 या क्रमांकावर ते तुम्ही संपर्क करू शकता.

Leave a Comment