Pik Vima Manjur 2025 शेतकऱ्यांसाठी पिक विम्याची सर्वात महत्त्वाची माहिती समोरील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2160 कोटी रुपयांचा जो काही विमा हा या ठिकाणी शेतकऱ्यांना जमा होणार आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 2 दिवसात हे हप्ता देणार असल्याची माहिती आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
शेतकरी खरिपातील पिक विमाची वाट बघत आहे, आणि यातच आता सरकारने आपला पहिला हप्ता ठरविल्याने 22 जिल्ह्यांमधील जवळपास 1960 कोटी विमा भरपाई पडली तर स्थानिक ने नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती बाबी अंतर्गत मिळणार भरपाईचे यामध्ये सामावेश आहे.
राज्य सरकार विमा कंपन्याला 700 कोटीचा निधी चा पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये देणार आहे. कंपन्याचा विमा हप्त मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई मिळणे सुरू होईल असा कृषी विभागांनी सांगितला आहे.
Pik Vima Manjur 2025 Details
राज्यातील 54 लाख 43 हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली असल्याचे देखील सूचना आहे. राज्य सरकारने विमा कंपन्याला पहिला हप्त मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल सरकार 2 दिवसांमध्ये हा हप्त विमा कंपनी देणार आहे असे कृषी विभागांनी सांगितले आहेत.
📢 हे पण वाचा :- काय सांगताय! 80 दिवस रिचार्जचं नो टेन्शन BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन आला
त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणार विमा भरपाई राज्य सरकारने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी भरपाई मिळणार आहे तर पाहूया.
यामध्ये धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, आणि गडचिरोली, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याची माहिती आहे.
22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून 145 कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. त्यापैकी 96 कोटी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली, आता उर्वरित या परिस्थितीत बाबीमधून 705 कोटी रुपये विमा भरपाई रुपये मंजूर करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकच बाबींमधून भरपाई मंजूर करण्यात आली असल्याची देखील माहिती आहे धन्यवाद.