Old Land Record From 1980 : जमिनीचे जुने रेकॉर्ड तुम्ही आता मोबाईलवर पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेखेच्या जुन्या नोंदी आहेत त्यावर महत्त्वपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध आहेत.
ही सर्व रेकॉर्ड भुमिअभिलेख द्वारे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेख विभागाकडून जमिनी संबंधीचे जुने रेकॉर्ड जतन करून ठेवले जाते. जे अत्यंत महत्त्वाचे आहे. अभिलेख विभागाकडून जतन करून ठेवण्यात आलेल्या रेकॉर्डची माहिती ऑनलाईन स्वरूपात अद्यावत केली जात आहे.
जुना ७/१२ रेकॉर्ड जमीन रेकॉर्ड
जुन्या सातबारा रेकॉर्डची डिजिटायझेशन केले जात आहे. जमिनीच्या रेकॉर्ड संबंधी वाद उद्भवल्यास अशा प्रकारचे जुने रेकॉर्ड उपयोगात येते.
आता तुमचा जिल्हा गाव निवडून तुम्ही मोबाईलवर आपल्या जमिनीचे जुने रेकॉर्ड पाहू शकता. जमीन मालकीचे हक्क आणि त्याबाबतची रेकॉर्ड पाहण्यासाठी तुम्हाला पुढील प्रक्रिया अवलंबावे लागेल.
व्हिडिओ पहा
https://www.instagram.com/reel/DOTIie7D8CL/?igsh=MTlvY3pha3F3MGF3NQ==
जुने रेकॉर्ड कसे पाहावे यासाठी येथे पहा
- भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे.
- येथे अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती जसे नाव, मोबाईल नंबर, पत्ता या सर्व गोष्टी भरावे लागेल.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर तुम्ही लॉगिन करून तुमचे जमिनीचे रेकॉर्ड पाहण्यासाठी पुढील प्रक्रियेचा अवलंब करा.
- तुम्हाला वरती ई रेकॉर्ड नावाचा पर्याय दिसेल
- या ई रेकॉर्ड नावाच्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा जिल्हा तालुका गाव निवडा.
- त्यानंतर तुमच्या सातबाराचा गट नंबर टाकून सर्च करा.
- खाली तुम्हाला विविध वर्षाचे जुने सातबाराचे रेकॉर्ड पाहायला मिळेल.