शेतीला तार कुंपण  85 टक्के अनुदान- या जिल्ह्याचे अर्ज सुरू : Land wire fence Application

वैयक्तिक लाभाच्या योजनांची 85 टक्के अनुदानावर काटेरी तार कुंपण Land wire fence Application, खाद्य स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशिन, ताडपत्री, इत्यादी योजना सुरू आहेत. 

वनहक्क जमीनप्राप्त शेतकऱ्यांसाठी तार जाळी, ताडपत्री आदी, तसेच आदिवासी महिला व पुरूष बचत गटांसाठी रेडीमेड होजिअरी गारमेंट आदी बाबी पुरवल्या जातात. या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या व्यक्तींनी अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे दि. 19 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 येथे अर्ज करा

Land wire fence Application आवश्यक कागदपत्रे

  • रहिवासी दाखला 
  • आधार कार्ड 
  • बँक खाते
  • अनुसूचित जमातीचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र 
  • इतर आवश्यक कागदपत्रे  

लाभार्थ्यांची निवड लक्ष्यांक, निधी व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता विचारात घेऊन केली जाईल, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

Leave a Comment