जमिनीशी संबंधित कागदपत्रे जसे कीLand Records Registry Document, फेरफार माहिती Land Registry Record, ऑनलाईन फेरफार स्थिती, Land Map Recod, शासकीय जमीन मोजणी हद्द या सर्व गोष्टी आता मोबाईलवर ऑनलाईन घरबसल्या पाहू शकता.
जमिनीशी संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत. जमिनीची विविध कागदपत्रे मोबाईलवर पाहता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे, जमिनीशी निगडित जुनी कागदपत्रे, वर दिलेल्या सर्व सेवा देण्यासाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
या पोर्टलवर खालील सुविधा उपलब्ध आहेत.
- फेरफार प्रत डाऊनलोड करणे
- मालमत्ता पत्रक डाऊनलोड करणे
- सातबारा फेरफार साठी अर्ज
- मिळकत पत्रिका फेरफार अर्ज
- फेरफार स्थिती अधिकार क्षेत्र जाणून घ्या
- प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरणे
- अभिलेख पडताळणी
- ई रेकॉर्ड्स इ नकाशा भू नकाशा
- ई मोजणी
- आपली चावडी ई चावडी ज
- मीन महसूल भरणा
- डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख पोर्टलवर तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी येईल हा ओटीपी टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
आपला जिल्हा, गाव, तालुका निवडून सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करता येतील.
महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख पोर्टल – जमीन रेकॉर्ड पाहण्यासाठी पोर्टल येथे क्लिक करा