Land Map Calculator Processing Software : जमिनीची मोजणी आधुनिक पद्धतीने व जलद गतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जमिनीच्या बांधावरून होणारे वाद मिटवण्यासाठी हा एक महत्वकांक्षी निर्णय आहे.
Land Map Calculator : जमीन मोजणी नवी पद्धत
जमिनीसाठी लागणारे रस्ते, जमिनीची हद्द, प्रत्यक्षात असलेली जमिनीचे क्षेत्र यावरून नेहमीच वाद होत राहतात.
आता हे वाद मिटवण्यासाठी सातबारा रेकॉर्डवर असलेली प्रत्यक्षात जमीनीचे क्षेत्र, जमिनीची हद्द, चतुर सीमा, जमिनीसाठी असणारा रस्ता या सर्व गोष्टींची जमीन नकाशावर land map उल्लेख असेल.
जमिनीसाठी लागणाऱ्या रस्त्याचे क्षेत्रफळ, लांबी रुंदी या गोष्टी मोजणे आता जीपीएस रोवर मशीनद्वारे अत्यंत सोपी प्रक्रिया असणार आहे.
भूमि अभिलेख विभागाकडून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना जीपीएस रोवर मशीनद्वारे जमीन मोजणी केली जाणार आहे.
जमीन धारकांना आता नवीन अद्यावत जमीन नकाशे डाऊनलोड करता येतील. पूर्वीच्या जमीन मोजणी पद्धती मध्ये सुधारणा करून नवीन डिजिटल पद्धतीने अचूक जमीन मोजणी करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आला आहे.
पूर्वीच्या जमीन मोजणी पद्धतीमध्ये खूप वेळ जात होता. आता जमीन मोजणी अचूक व लवकर केले जाणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने जमीन मोजणी मध्ये अचूकता येणार आहे.