मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण के वाय सी साठी मुदत Ladaki Bahin e Kyc
Ladaki Bahin e Kyc : बहिणी योजनेमध्ये सर्वात मोठे अपडेट आलेले आहे. आता सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेची ई केवायसी (Ladaki Bahin e Kyc) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेची केवायसी दरवर्षी जून महिन्यामध्ये करावी लागणार आहे.आणि यावर्षी म्हणजे 2025 मध्ये तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.
Ladaki Bahin e-Kyc केवायसी करण्यासाठी आधार कार्ड ची माहिती घेतली जाणार आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची e-Kyc प्रक्रिया पुढील प्रमाणे असेल.
सर्वात अगोदर तुम्हाला लाडकीबहीण.महाराष्ट्र.जीओव्ही.इन या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
- या वेबसाईटवर मुख्यपृष्ठावर तुम्हाला एक केवायसी चा पर्याय उपलब्ध असेल.
- या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून संकेतांक नंबर टाकून व्हेरिफाय करावे लागेल.
- यानंतर तुमची केवायसी झाली आहे का हे तपासले जाईल.
- त्यानंतर तपासले जाईल की तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीत आहे का.
- जर लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादी मध्ये तुमचे नाव नसेल तर तसा संदेश स्क्रीनवर दिसेल.
आणि जर तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादी मध्ये असेल तर तुम्हाला केवायसी साठी आधार लिंक मोबाइल वर ओटीपी प्राप्त होईल.
- यानंतर तुमच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट करावा लागेल.
- यानंतर महिलेचा पती किंवा वडील यांचे आधार कार्ड देखील तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागेल.
- पतीचा किंवा वडिलांचे आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी प्राप्त होईल.
- तो ओटीपी टाकून सबमिट पर्यावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर पुन्हा तुम्हाला सर्व नियम अटी मान्य असल्याचे पर्याय दिसेल. Ladaki Bahin e Kyc
- या पर्यायांमध्ये विचारलेले आहे की तुमचा जात प्रवर्ग कोणता आहे.
- तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेमध्ये नाही.
- तुमच्या कुटुंबात दोन किंवा दोन पेक्षा जास्त विवाहित महिला नाही
- या सर्व गोष्टी मान्य केल्यानंतर तुमची एक केवायसी पूर्ण होईल.
तसेच खालील युट्युब व्हिडीओ पहा