लाडकी बहिण योजना यादी येथे प्रसिध्द : अर्ज केलेल्या पात्र महिलांची यादी पहा Ladaki Bahin beneficiary  List 

Ladaki Bahin beneficiary  List : ग्रामस्तरीय  समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर  वाचन करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यादी :  तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध केली जाणार आहे. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास किंवा काही त्रुटी असल्यास निराकारण करण्यात येणार आहे.

दुरुस्ती आणि डुप्लिकेशनचे फॉर्म आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी टाळले जाणार आहे. 

अर्जदार महिला पात्र झाली असेल तर अंतिम पात्र लाभार्थ्याची यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीमध्ये पाहता येणार आहे.  त्रुटी मध्ये फॉर्म पडला असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्त केला जाणार आहे. 

लाडकी बहिण पात्रता यादी येथे पहा 

 आता या ग्रामस्तरीय समितीमध्ये ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक, अन्य ग्रामस्तरीय  कर्मचारी यांचे मिळून समिती स्थापन करण्यात येणार आहे.

नारी शक्ती app वरून अर्ज केला असेल तर- 

जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर नारीशक्ती दूध नावाचे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.

  1.  सुरुवातीला हे ॲप तुम्हाला अपडेट करून घ्यावे लागेल.
  2.  या ॲपमध्ये मी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
  3.  जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या अर्जापुढे Approved असे लिहून येईल.
  4.  किंवा तुमचा अर्ज Pending मध्ये देखील असू शकतो. जर तुमचा अर्ज Pending मध्ये असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे.
  5. परंतु जर तुमचा अर्ज Disapproved झाला तर मात्र तुम्हाला अर्ज पुन्हा भरावा लागेल.  ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट होतील त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

https://www.instagram.com/p/C97VS_8N1hk/

Leave a Comment