Ladaki Bahin 8th installment: लडकी बहीण योजनेचे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. फेब्रुवारी चा आठवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे.
याबाबत राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. सोबतच अपात्र महिला संख्येत देखील वाढ झालेली दिसत आहे.
8 वा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यात येणार
आतापर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारीपर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता यापुढील आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात क्रेडिट केला जाणार आहे.
परंतु हे पैसे पात्र महिलांच्याच खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत.
या अगोदर जवळपास 5 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आले आहेत. आता ही संख्या वाढून नऊ लाख महिलांपर्यंत गेली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्याआधीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. शासनाच्या इतर योजनेमधून ज्या महिलांना लाभ मिळत आहेत अशा महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार असल्याबाबत माहिती समोर आलेली आहे.