फक्त या शेतकऱ्यांना 5 लाखांचे कर्ज : तेही फक्त या 4 कागदावर पहा लिस्ट : Kisan Credit Card

By Krushi Market

Published on:

Kisan Credit Card

Kisan Credit Card : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही शेतकरी असाल तर ही माहिती नक्कीच कामाची असणार आहे किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाची कर्ज मर्यादा ठरवण्यात आलेली आहे.

अगोदर ही 3 लाख रुपये पर्यंत होती तर आता 4 टक्क्यांनी वित्त पुरवठा होणार आहे आता हे कर्ज कसे घ्यायचे ? KCC साठी कोण कोणती कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला आवश्यक ? याची माहिती आपण जाणून घेऊया.

किसान क्रेडिट कार्ड 5 लाख मर्यादा घोषणा 2025

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यात किसान क्रेडिट कार्ड वरून केला जाणारा वित्तपुरवठा 3 लाखांवरून आता 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे.

KCC किसान क्रेडिट कार्डची सुरुवात कशी व कधी झाली.?

किसान क्रेडिट कार्डची सुरुवात 1998 मध्ये झाली होती, R.V. गुप्ता समितीच्या शिफारशीवरून याची सुरुवात करण्यात आली त्यापासून आतापर्यंत वेळोवेळी आढावा घेण्यात आला.

हे पण वाचा :- विवाह नोंद अशी करा : कागदपत्रे व PDF अर्ज नमुना – विवाह प्रमाणपत्र PDF डाऊनलोड करा 

Kcc क्रेडिट कार्ड कोणाला व कधी मिळू शकते..??

आता शेतकऱ्यांना त्यांच्या अल्पकालीन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मिळत असत, आता किसान क्रेडिट कार्ड मध्ये वित्त पुरवठा केला जातोय.

 

कोणते शेतकरी KCC साठी पात्र आहेत?

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड हे खालीलप्रमाणे मिळते पहा लिस्ट

1. शेतकरी
2. भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरी
3. शेतकरी गट

 

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 2025 लिस्ट

 

1. शेतकऱ्यांकडे ओळखपत्र
2. सातबारा उतारा
3. 8 अ उतारा
4. मतदान कार्ड
5. पॅन कार्ड
6. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे सभासद

किसान क्रेडिट कार्ड किती रक्कम व व्याजदर असते..?

आता किसान क्रेडिट कार्ड वर 1 लाख रुपये पर्यंत कर्ज बिनव्याजी ही तुम्हाला मिळत असतं, 1 लाख 60 हजार रुपये पर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागत नाही, तर 3 लाख ते 5 लाख रुपये पर्यंत कर्जासाठी तारण द्यावा लागेल, शिवाय किसान क्रेडिट कार्ड वर 5 लाख रुपये उपलब्ध होणारे कर्ज हे 7% टक्क्याने मिळत वर्षभर ते परत फेडल्यास 3 टक्के सूट म्हणून 4% ने कर्ज तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं.

आता ही अशी योजना आहे आधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या बँकेची संपर्क करू शकता, आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.

Leave a Comment