आज आपण जॉब कार्ड डाउनलोड Job Card Download कसे करावे याची माहिती पाहणार आहोत. तसेच जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करावा त्याची माहिती देखील पाहणार आहोत.
जॉब कार्ड हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे विविध सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
नवीन जॉब कार्ड काढणे व जॉब कार्ड डाउनलोड करणे ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा व समजून घ्या.
जॉब कार्ड काय असते व कसे डाउनलोड करावे Job Card Download
महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये नोंदणीकृत कुटुंबाना जॉब कार्ड Job Card दिले जाते. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकांना जॉब कार्ड दिले जाते.
रोजगार हमी योजनेत नोंदणी करण्यासाठी ईच्छुक असतील त्या सर्व लोकांची ग्रामपंचायत कडून रोजगार हमी योजनेत नोंदणी करून त्यांना जॉब कार्ड दिले जाते.
जॉब कार्ड चा उपयोग कोठे -कोठे होतो ?
Pm Awas Yojn Job Card प्रधानमंत्री आवास योजना मध्ये जॉब कार्ड चा उपयोग
घरकुलाच्या जेवढ्या योजना राबविला जातात त्या सर्व योजनांसाठी लाभार्थ्याकडे जॉब कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. जॉब कार्ड वरून त्या लाभार्थ्यांचे रोजगार हमी मध्ये मस्टर भरले जातात व त्याच्या खात्यात हजेरीचे पैसे पाठविले जातात.
जॉब कार्ड कसे काढावे New Job Card Apply
जर तुमचे कुटुंब रोजगार हमी योजनेसाठी नोंदणीकृत नसेल तर तुम्ही नवीन जॉब कार्ड काढू शकता.
जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील १८ वर्षा वरील सर्व सदस्यांचा एकत्रित मोठा फोटो व सर्व सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स हे गावातील ग्राम रोजगार सेवकाकडे द्यावे लागेल ते तुम्हाला नवीन जॉब कार्ड देतील.
ऑनलाईन जॉब कार्ड कसे काढावे
जर तुम्ही अगोदरच रोजगार हमी योजनेत नोंदणीकृत असाल तर तुम्ही जॉब कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता. जॉब कार्ड कसे डाउनलोड करावे याची माहितीसाठी खालील युट्युब व्हीडीओ पहा