Get Free Pipeline Subsidy : तुम्ही शेतकरी असाल तर ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे शेतकऱ्यांना शेती करत असताना आवश्यक असतं ते म्हणजे शेतात पाणी, पाणी असेल तर शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पादन देखील घेऊ शकतो तर अशाच सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन पाईपलाईन अनुदान योजना 2025 सुरू केलेली आहे.
या योजनेतून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येतात आणि पाईपलाईन तुम्हाला मिळवता येते तेही चांगल्या अनुदानावर तर आता यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असेल अर्ज प्रक्रिया काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाईपलाईन खरेदीवर 50% अनुदान मिळत आहे तर आता या ठिकाणी संपूर्ण माहिती काय ? हे आपण पाहूया आजच्याकाळी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावं लागत असते हे आपल्याला माहितच आहे अनियमित पाऊस / वाढते उत्पादन खर्च / आणि पाणी व्यवस्थापनाच्या समस्यांमुळे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे उभे राहतात या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना पाईपलाईन अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
कोणकोणत्या पाईपलाईनसाठी किती अनुदान मिळते?
- एचपीएचडी (HDPE) पाईप : प्रति मीटर 50 रुपये अनुदान
- पीव्हीसी (PVC) पाईप : प्रति मीटर 35 रुपये अनुदान
- HDPE लाईन विनाईन फॅक्टर : प्रति मीटर 20 रुपये अनुदान
शेतकरी पाईपलाईन अनुदान योजना आवश्यक पात्रता आणि निकष ?
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक
- शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे बंधनकारक
- आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक
- एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला सदर योजनेचा लाभ मिळतो
शेतकरी पाईपलाईन अनुदान योजना 2025 आवश्यक कागदपत्रे लिस्ट
- नवीन सातबारा उतारा
- 8 अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- शेतकऱ्याच्या नावावर रहिवासी दाखला
- पाणीपुरवठ्याचा पुरावा (आवश्यक असल्यास)
- शेतकरी असल्याचा पुरावा
पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र 2025 ऑनलाइन अर्ज कुठे आणि कसा करावा ?
शेतकरी बांधवांनो पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करता येणार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकता. इतर योजनेसाठी ज्या पद्धतीने अर्ज तुम्ही केले असेल कांदा चाळ ट्रॅक्टर पावर टिलर किंवा इतर योजना त्याच पद्धतीने महाडीबीटी फार्मर पोर्टलवर
देखील पाईपलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज करता येतो, अधिक माहितीसाठी महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे, तिथे जाऊन माहिती वाचून ऑनलाइन अर्ज करू शकता धन्यवाद.