Gai Gotha Yojana 2024 Online Apply : गाय गोठा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत गाय गोठा योजनेअंतर्गत अर्ज कसा भरावा
गाय गोठा साठी अर्ज करण्याची पद्धत समजून घ्या. . गाय गोठ्यासाठी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत मध्ये ठराव मध्ये नाव समाविष्ट करावे.
यानंतर विहित नमुन्यातील अर्ज नमुना येथे उपलब्ध आहे तो डाउनलोड करून भरावा.
काय गोट्याचा प्रस्ताव पंचायत समिती येथे जमा करावा लागेल. गाय गोठ्याचा प्रस्ताव जमा केल्यानंतर आपल्या अर्जास मंजुरी दिली जाईल.
यानंतर आपल्या ला ज्या ठिकाणी गोठा बांधायचा आहे त्या जागेचे जिओ टॅगिंग केले जाईल. जिओ tagging झाल्यानंतर आपल्याला वर्क ऑर्डर दिली जाईल.
गाय गोठा अर्ज नमुना पीडीएफ
अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचे आहे.
लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व ७/१२ व ८ अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे. लाभार्थ्याला गावचा रहीवाशी पुरावा जोडायचा आहे.
तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.
त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीच एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्या नुसार पोचपावती दिली जाईल.