शेतकऱ्यांना आता सिंचनाची झाली चांगली सोय ! या योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी शासन देत आहे 90 टक्के अनुदान .

केंद्र शासन शेतकऱ्यांकरिता एक नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. त्या योजनेच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना सबसिडी देत आहे आणि ती सबसिडी 90% पर्यंत मिळत असल्यामुळे खरोखर या योजनेच्या अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे.जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आवश्यक आहे. आजच्या लेखामध्ये आपण शासनाने राबवलेल्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतातील उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढऊ शकणार आहेत.

शेतकरी मित्र त्यांच्या शेतामध्ये पाणी देण्याकरिता इलेक्ट्रॉनिक ट्यूब वेल चा वापर करत असतात, या संदर्भात बद्दल शासन कशाप्रकारे मदत करत आहे याची माहिती जाणून घेऊया.

सरकारची पीएम कुसुम योजना –

शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून त्यांच्या जमिनीवरती सोलर पॅनल बसविण्याकरिता अनुदान देत आहे. पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 90 टक्के पर्यंत अनुदान भेटत आहे. सर्व शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर करून, नैसर्गिक संपत्तीचा वापर करून, कमी खर्चामध्ये चांगले पीक घेता यावे याकरिता पीएम कुसुम सोलार पंप योजना राबविण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्याची सुविधा केंद्र शासन उपलब्ध करून देत आहे.

या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन यासोबतच राज्य शासन शेतकऱ्यांना 60 टक्के पर्यंत देत आहे. यासोबतच 30% पर्यंत लोक बँकेच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेण्याकरिता कर्ज सुद्धा घेऊ शकत आहेत. अशा सुविधा शासनाने दिलेल्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोलर पंप द्वारे शेतामध्ये सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. शासनाने ही योजना 2019 साली सुरू केली होती. त्यानंतर हळूहळू ही योजना सर्वत्र चालवण्यात आले व सर्वत्र पोहोचवण्यात आले.

अशाप्रकारे या योजनेचा लाभ असा घ्यावा –

शेतकरी बंधू भगिनींनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. लेखाच्या सर्वात खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही शासनाच्या संकेतस्थळावरती जावा. त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरावा लागेल, ऑनलाइन फॉर्म भरत असताना आधार कार्ड, खाते उतारा, सातबारा, डिक्लेरेशन फॉर्म व बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती सोबत असणे आवश्यक आहे. इत्यादी माहिती घेऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सबमिट करावा. जर तुम्ही या योजनेस पात्र असाल तर शासन तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून अनुदान पुरवेल.

शासनाच्या संकेतस्थळावरती भेट देण्याकरिता खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्या. www.mahasolarpump.gov.in

Leave a Comment