या उन्हाळ्यात शेतात जाण्यासाठी बैलगाडी रस्ता मिळवा : Farm Road Application 

By Krushi Market

Published on:

Farm Road Application : मोठ्या प्रमाणात झालेल्या जमिनीच्या व्यवहारामुळे जमिनीचे छोटे तुकडे झाले. जमीन मालक बदलले. 

स्वतःच्या शेत जमिनी मध्ये जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नसेल तर ? 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम १४६ नुसार इतर भूमापन क्रमांकाच्या सीमेवरून रस्ता उपलब्ध करून देण्याच्या अधिकार तहसीलदारांना आहे.

तसेच वहीवाटीतील, नकाशातील बंद असलेला रस्ता अतिक्रमित असलेला रस्ता मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5 ( shet rasta kayda )करण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत.

  • अर्जदाराच्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा.
  • अर्जदाराच्या शेत जमिनीचा शासकीय मोजणी नकाशा (उपलब्ध असल्यास).
  • अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील (तीन महिन्याचा आतील) सात-बारा उतारा. ( 7/12 land record )

तुम्हाला जर शेत रस्ता हवा असेल तर अगोदर रीतसर मागणी करावी लागते. शेत रस्ता मागणी अर्ज pdf मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. 

जमीन मोजणी अर्ज येथे करा 

अर्ज डाउनलोड करण्यासाठी आणि शेत रस्ता मागणी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बटनावर क्लिक करा किंवा टच करा.

शेत रस्ता मागणी अर्ज डाउनलोड करून तो प्रिंट करून घ्या त्यामध्ये योग्य ती माहिती भरून तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात सादर करून द्या. 

शेत रस्ता मागणी अर्ज

शेत रस्ता मागणी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे 

ज्या शेतातून रस्ता हवा आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांचे रस्त्याच्या बाबतीत ना हरकत प्रमाणपत्र.

अर्जदाराची ज्या ठिकाणी शेतजमीन आहे त्या जमिनीच्या लगतच्या शेतजमीनच्या बांधावरून रस्ता जाणार आहे त्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा सादर करवा.

अर्जदाराचा जमिनीचा सातबारा अर्जासोबत जोडावा जो कि तीन महिन्यापेक्षा जुना नसावा.

अर्जदाराच्या शेतजमीनीलगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील इत्यादी.

जो अर्जदार आहे त्याच्या जमिनीचा जर कोर्टात केस चालू असेल तर त्या संदर्भातील तपशील सुद्धा जोडावे.

अर्जदाराच्या जमिनीचा शासकीय नकाशा.

इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

अशा पद्धतीने तुम्हाला शेतात जाण्यासाठी बैलगाडी रस्ता मिळू शकतो.

Leave a Comment