e Pik Pahani New App DCS : इ पिक पाहणी करणे गरजेचे आहे. प्ले स्टोर वरून इ पिक पाहणीचे नविन मोबाईल app डाउनलोड करून आपल्या पिकाची इ पिक पाहणी करून घ्या.
ई पीक पाहणी करणे का गरजेचे आहे आपली पीक पाणी केल्यामुळे आपल्या शेतात पिकाची नोंद होते. तसेच पिकावर कुठलाही नुकसान झाले तर नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी शासनाकडून मदत मिळते.
ई पिक पाहणी सोप्या पद्धतीने
जर तुम्ही पिक विमा भरला असेल तर पिक विमा मिळण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. ई पी पाहणी केल्यावर तुमच्या शेतात कोणती पिके आहेत याचे रेकॉर्ड तुमच्या सातबारावर नोंदविले जाते.
ई पीक पाहणी नविन app प्ले स्टोर वर पहा
ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना खूप अडचणी निर्माण होत आहेत. आता आपण सोप्या पद्धतीने एपी पाहणे कशी करायची ते समजून घेऊया.
यासाठी अगोदर प्ले स्टोअरवरून एपीक पाहणीचे नवीन ॲप अपडेट झालेले ॲप डाऊनलोड करून घ्या.
त्यानंतर एपीक पाहणी करण्यापूर्वी आपल्या फोनची लोकेशन चालू करा.
तसेच खात्री करा की आपल्या फोनचे इंटरनेट देखील चालू असावे.
ई पीक पाहणी करताना स्वतः तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जिथे तुमचे लोकेशन असेल त्या ठिकाणी जावे लागेल.
जर तुमच्या शेतामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नसेल किंवा इंटरनेटची स्पीड कमी असेल तर अगोदर ज्या ठिकाणी इंटरनेट स्पीड चांगली आहे त्या ठिकाणी खातेदार नोंदणी करून घ्या.
खातेदार नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला पिकाचा फोटो काढण्यासाठी तुमचा शेतातील सातबारा गट नंबर मध्ये जावे लागेल.
त्यानंतर तुमच्या पिकाचा फोटो काढा व तिथे इंटरनेट व्यवस्थित नसेल तर ज्या ठिकाणी इंटरनेट स्पीड चांगला असेल त्या ठिकाणी येऊन तो फोटो अपलोड करून.
ई पीक पाहणी सबमिट करा.