आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या निधीच्या वेळेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई वितरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
जानेवारी 2023 पासून राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई वितरित करण्याचे नियम बदलण्यात आले आहेत.
- बँक खाते क्रमांक आणि आधार कार्ड अचूक आहे का?
- अनुदान योग्य व्यक्तीच्या बँक खात्यात जमा होते का?
- डीबीटीद्वारे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाईल.
राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्य सरकारकडून मदत वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अद्याप वाटप न झालेल्या अनुदानाबाबत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून राज्य सरकारने अधिकृतरीत्या मान्यता दिली आहे, ज्यामुळे यासाठी मदतीचा दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 जिल्ह्यांतील 27 लाख शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रूपयांचे वितरित केले जाणार आहेत.
अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम वर्ग केले जाणार आहे.
नुकसान भरण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे.
जर आपण आपल्या पिकाचा पिक विमा भरलेला असेल तर आपण पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करू शकता.