अर्ज कसा करावा?
ब्युटी पार्लर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सूचना आणि व्हिडीओ जरूर पहा.
-
सर्वप्रथम आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवर (👉 nbtribal.in) भेट द्या.
-
होमपेजवर दिसणाऱ्या तीन आडव्या रेषांवर (Menu Bar) क्लिक करून “अर्जदार लॉगिन” हा पर्याय निवडा.
-
तुमचा User ID, पासवर्ड आणि Captcha Code टाकून साइन इन करा.
-
लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवर ऑनलाइन अर्ज फॉर्म उघडा आणि सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
-
आवश्यक कागदपत्रांची PDF फाईल अपलोड करा.
-
फॉर्म भरल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवा.
-
पुन्हा डॅशबोर्डवरील तीन आडव्या रेषांवर क्लिक करून “अर्ज व्यवस्थापन” पर्यायाखालील “अर्ज करा” या बटणावर क्लिक करा.
-
शेवटी योजनेचे नाव निवडा या ठिकाणी — “अनुसूचित जमातींच्या महिलांना ब्युटी पार्लरचे दुकान उभारण्यासाठी 85% अनुदानासह 50 हजार रुपये देणे” हा पर्याय निवडा.
👉 एवढ्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल.