Nuksan Bharpai GR शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे, राज्य सरकारने जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पुरवणाऱ्या नुकसान झालेले शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांना सात कोटी 733 कोटी 45 लाख 84 हजार रुपयांचा निधी मंजूर केला याबद्दल शासन निर्णय प्रकाशित केला आहे.
राज्यात नैसर्गिक आपत्ती झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत करण्यात येणार आहे, राज्यातील 5 विभागातील 22 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे, 1 जानेवारी 2024 शासन निर्णयानुसार 3 हेक्टरच्या मर्यादेत हा निधी शेतकऱ्यांना थेट बँक द्वारे जमा केले जाणार आहे.
- नाशिक विभागाला सर्वाधिक 363 कोटी 66 लाख 23 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.
- अमरावती विभागाला 324 कोटी 47 लाख रुपये मंजूर करण्यात निधी मिळाला आहे.
- पुणे विभागासाठी 16 कोटी 2 लाख 4 हजार रुपये
- नागपूर विभागासाठी 24 कोटी 14 लाख 25 हजार रुपयांनी मंजूर करण्यात आलाय