solarpump मागेल त्याला सौर पंप योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा.?
मागेल त्याला सौर पंप योजना या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला offgridagsolarpump.mahadiscom.in अथवा kusum.mahaurja.com अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावे लागतील.
मागेल त्याला सौर पंप योजना अर्ज करण्याचे टप्पे?
या सौर पंपासाठी अर्ज करायचे असतील तर ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता, त्यासाठी mahadiscom.in आणि kusum.mahaurja.com संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून सौर पंप योजना अर्ज करता येतात. कागदपत्रे अपलोड करणे यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावेत, या ठिकाणी पाहून सर्व माहिती पडताळून अर्ज सबमिट करावा लागतो.
मागेल त्याला सौर पंप योजना आवश्यक असणारी कागदपत्रे?
7-12/ 8अ उतारा, शेत जमिनीचा पुरावा/ आधार कार्ड/ रहिवासी प्रमाणपत्र/ बँक खात्याचे पासबुक/ विहीर & बोरवेल शेतकऱ्यांचे स्वंयघोषणा प्रमाणपत्र आणि सामायिक शेती असेल तर ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे आवश्यक आहे अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती पाहू शकतात.