रेशन कार्डची केवायसी करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. ज्या लोकांची रेशन कार्ड ची केवायसी पूर्ण होईल त्यांचे रेशन कार्ड चालू राहणार आहे.
परंतु जे नागरिक आपली रेशन कार्ड ची केवायसी पूर्ण करणार नाही अशा लोकांचे रेशन धान्य बंद होऊ शकते. तसेच रेशन कार्ड च्या बाबत मिळणाऱ्या इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास देखील अडचणी निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे रेशन कार्डची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे.
आपली केवायसी पूर्ण झाले का कसे चेक करावे?
जर तुम्हाला चेक करायचे असेल की आपण आपली केवायसी पूर्ण केली का यासाठी तुम्ही खालील पद्धतीने चेक करू शकता.
पद्धत 1
- यासाठी प्ले स्टोर वरून मेरा रेशन 2.0 हे ॲप डाऊनलोड करा.
- मध्ये आपला कुटुंबप्रमुखाचे आधार कार्ड नंबर टाकून लॉगिन करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर मेरा रेशन ॲप मध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध असेल.
- सर्वात वरती तुम्हाला तुमचे रेशन कार्ड दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे दिसेल.
- कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे केवायसी झाली आहे की नाही त्याचे स्टेटस देखील दिसेल.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्ड ची केवायसी चे स्टेटस चेक करू शकता.
पद्धत 2
किंवा तुम्ही तुमच्या रेशन धान्य दुकानदाराकडे जाऊन देखील आपली केवायसी करून घेऊ शकता व आपल्या केवायसी चे स्टेटस देखील चेक करू शकता.