शेतकऱ्यांना खरीप पिक विम्याचे पैसे आता लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिक विमा कंपन्यांना सूचना दिले आहेत.
अग्रीम पिक विमा ची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. दहा डिसेंबर पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम जमा करावे याबाबत विमा कंपन्यांना सूचना देण्यात आली आहे.
राज्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी किंवा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्वांचा विचार करता पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणे आवश्यक आहे. अशातच पिक विमा कंपनीकडून पिक विमा देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे.
पिक विम्याची अग्रीम रक्कम यापूर्वी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आलेली आहे. परंतु अजूनही खूप शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज प्रलंबित आहेत.
पिक विमा साठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा जमा करावा याबाबत पिक विमा कंपन्यांना सूचना देण्यात आले आहेत. पिक विमा कंपनीकडून वेळ काढून पणा केला जात असल्यामुळे आता अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.