Well Subsidy App Download : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा च्या अंतर्गत वैयक्तिक लाभा ची सिंचन विहीर खोदण्या साठी ₹4,00,000 अनुदान दिले जाते. विहिरीसाठी आता मोबाईल ॲपच्या मदतीने ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
पूर्वी विहिरीचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन पंचायत समिती येथील रोजगार हमी विभागांमध्ये फाईल दाखल करावी लागत होती. आता मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत लाभार्थी घरबसल्या मोबाईल वरून अर्ज करू शकतो. नरेगा अंतर्गत विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाते.
विहिरीसाठी पात्रता काय लागते ? लाभार्थी निवड कशी केली जाते ? ऑनलाइन अर्ज कसा करावा ? याबाबत आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
विहिरीसाठी पात्रता काय लागते ?
- अर्जदाराकडे किमान एक एकर शेतजमीन असावी. पूर्वी ही मर्यादा 60 गुंठे होती.
- पिण्या च्या पाण्याच्या विहिरी पासून 500 मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर करता येणार आहे.
- त्या पेक्षा कमी अंतरावर सिंचन विहीर घेता येणार नाही.
- तसेच दोन विहिरीपेक्षा मध्ये दीडशे मीटर पेक्षा कमी अंतर असू नये
- लाभार्थ्याकडे पूर्वी त्याच्या सातबारावर विहिरीची नोंद नसावी
विहिरीसाठी लाभार्थी निवड कशी केली जाते ?
विहीर योजनेत पुढील घटकांना प्राधान्य दिले जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी स्त्री कर्ता असलेली कुटुंब विकलांग, व्यक्ती, कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणां चे लाभार्थी इंदिरा आवास योजनेच्या पाच एकर पर्यंत जमीन आहे असे अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
विहिरीसाठी आवश्यक कागदपत्रे
- नरेगा जॉब कार्ड
- आधार कार्ड
- सातबारा उतारा
- जातीचा दाखला असेल तर
- अल्पभूधारक प्रमाणपत्र
- ग्रामपंचायत संमती पत्र किंवा ठराव
विहिरीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
विहिरीसाठी आता नवीन मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे या मोबाईल ॲपच्या मदतीने तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज सादर करू शकता अर्ज कसा करावा त्याचा व्हिडिओ येथे पहा.