पिक विमा वाटप तारीख फिक्स : 75% kharip Pik Vima

75% kharip Pik Vima : पिक विमा कंपनीने 25 टक्के अग्रिम पिक विमा दिला आहे. उर्वरित ७५ टक्के नुकसानभरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोग अहवालाचा आधार घेतला जातो.

या पीककापणी अहवालातून संबंधित महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन ठरविण्यात येते. नुकसानभरपाई देताना सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या कमी असल्यास पूर्वी दिलेली पंचवीस टक्के अग्रिम वजा करून उर्वरित रक्कम विमा कंपन्यांकडून दिली जाते.

त्यानुसार कृषी विभागाने तयार केलेल्या पीक कापणी अहवालाचे आकडे विमा कंपन्यांच्या पीकविमा पोर्टलवरअपलोड करण्यात आले आहेत. उत्पादनाचे हे आकडे गृहीत धरून विमा कंपन्या नुकसानभरपाईचा दावा निश्चित करण्यात आला आहे.

त्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरित नुकसानभरपाई मिळू शकते परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही.

अवकाळी पावसाने नुकसान एवढी भरपाई मिळणार

येथे पहा 

Maharashtra Kharif Crop Insurance : मागच्या वर्षी अल निनोच्या स्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी अत्यंत कमी पावसाची नोंद झाली. दरम्यान कमी पावसाने खरीप हंगामावार मोठा परिणाम झाला. यावर राज्य आणि केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली. उत्पादनात घट होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम अग्रिम म्हणून देण्यात आली. उर्वरित रकमेबाबत पीककापणी अहवालाचा आधार घेऊन विमा कंपन्या निर्णय घेणार आहेत.

दरम्यान खरीप हंगाम गेला रब्बी हंगामाच्या कापण्या सुरू झाल्या तरी केंद्र सरकारकडून दोन हजार कोटी रुपयांचा दुसरा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात आला नाही. यामुळे शेतकरी विम्याच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेतून राज्यातील २४ जिल्ह्यांमधील ५० लाख ९४ हजार ४६७ शेतकऱ्यांना २ हजार २०६ कोटी रुपयांची २५ टक्के अग्रिम जाहीर करण्यात आली.

Leave a Comment